प्रत्येक देशात बलात्कार हा गुन्हा मानला जातो. बलात्काराच्या दोषींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. मात्र, जगातील विविध देशांमध्ये बलात्काराच्या गुन्हेगारांना अनेक प्रकारे शिक्षा दिली जाते. पण आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत जिथे बलात्काराच्या आरोपींना तुरुंगात डांबले जात नाही, तर त्यांना एक सुंदर बंगला दिला जातो. हे जाणून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे बलात्काराच्या आरोपींना बंगल्यात सर्व सुविधा मिळतात. या बंगल्यात तो पत्नी आणि मुलांसह राहू शकतो. वास्तविक फ्लोरिडाच्या बाहेरील भागात म्हणजेच मिरॅकल व्हिलेजमध्ये, बलात्काराच्या आरोपींसाठी सुंदर बंगल्यांची एक मोठी वसाहतच आहे. येथे सुमारे दोनशे बलात्काराचे आरोपी आपल्या कुटुंबियांसोबत जीवन जगत आहेत. चला जाणून घेऊया यामागचे कारण काय?
पोलिसांनी बलात्कारातील काही आरोपींना मिरॅकल व्हिलेजमध्ये ठेवले आहे, तर अनेक आरोपींना कुटुंबीयांनी सोडून दिले आहे. या आरोपींना कोणी मान दिला नाही, त्यांना राहण्यासाठी जागाही मिळत नव्हती. अशा परिस्थितीत आरोपींना राहण्यासाठी घर मिळाले आणि येथे राहून त्यांना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होतो.
वीस एकरात पसरले आहे व्हिलेज
सुमारे २० एकरात वसलेले हे छोटेसे गाव आहे. हे गाव २००९ मध्ये बलात्काराच्या दोषींसाठी स्थापन करण्यात आले होते. त्याला आपल्या कुटुंबासह येथे आरामात राहता यावे म्हणून हे करण्यात आले. या आरोपीवर अमेरिकेत लैंगिक अत्याचाराचे सर्वाधिक आरोप असल्याचे सांगितले जात आहे.
एका फोटोग्राफरने या गावात राहणाऱ्या लोकांबद्दल सांगितले आहे. हे गाव १९६० मध्ये घरातील नोकरांसाठी तयार करण्यात आले. मात्र, एखाद्यावर अत्यंत गंभीर आरोप होत असल्यास तो येथे राहू शकत नाही.
एका खास उद्देशासाठी वसवले गेले गाव
हे गाव वसवण्यामागे विशेष हेतू होता. हे गाव पास्टर डिक इथरो यांनी वसवले होते. फ्लोरिडामध्ये लैंगिक अत्याचाराच्या आरोपीसाठी घर मिळणे अत्यंत कठीण होते, असे त्यांचे म्हणणे आहे. नियमांनुसार, लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्यांना त्या भागातील शाळा, खेळाचे मैदान, उद्याने किंवा मुलांशी संबंधित कोणत्याही गोष्टीपासून १००० फूट परिसरात राहू शकत नाही. त्यामुळे या आरोपींना घरी पोहोचवणे अशक्य होते.
या गावात मर्यादित घरे आहेत. घरांच्या संख्येपेक्षा अधिक अर्ज येथे राहण्यासाठी येतात. वेटिंग सिस्टीमनुसार येथे लोक घरे मिळवतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या गावात राहणाऱ्या लोकांना अनेक प्रकारचे क्लासेस दिले जातात. याशिवाय अनेक प्रकारचे कार्यक्रम चालवले जातात. येथे राहणारे बहुतांश लोक आजूबाजूच्या परिसरात काम, नोकरी करतात. या गावात स्थायिक झालेले पास्टर दर आठवड्याला त्यांना खऱ्या मार्गावर जाण्यासाठी बायबलचे वर्ग देतात. ते लोक तिथे आरामात राहतात.