चेन्नई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला अखेर उपरती झाली. आता त्यांनी मिस्टर आयपीएल सुरेश रैना याला पुढील मोसमासाठी संघात परतण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे संकेत दिले आहेत. ट्विटरवर दिलेल्या या संकेतावर रैनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यंदाच्या स्पर्धेचे विजेतेपद गुजरात टायटन्सने पटकावले होते. या स्पर्धेचे चार वेळा विजेतेपद मिळवलेल्या चेन्नई संघाला यंदा प्लेऑफ गटातही प्रवेश करता आला नाही. या स्पर्धेच्या लिलावापूर्वी चेन्नईने रैनाला रिलीज केले होते, तसेच त्याला लिलावातही कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते, त्यामुळे निराश झालेला रैना स्पर्धेदरम्यान एका वाहिनीवर समिक्षक म्हणून काम करताना दिसला. आता मात्र, चेन्नईच्या ट्विटनंतर तो पुढील मोसमात चेन्नई संघात परतणार असल्याचे दिसत आहे.