मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या महिला अत्यांचारांचे आरोपामुळे महाविकास आघाडीचे सरकार बॅकफूटवर आले आहे. त्यात आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.
साधू हे मनोरुग्ण आहेत, व साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाही; असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवारांनी केलं आहे. ते नागपूर येथून बोलत होते. पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला संतांची संस्कृती लाभलेली आहे. महाराष्ट्र संतांच्या शिकवणीवर उभा राहिला. संत व साधू हे वेगवेगळे आहे. संत हे समाजासाठी समर्पित आहे. संत हा समाजाचा दिशादर्शक आहे पण हे साधू लुबाडणारे असतात, अस ते म्हणाले. यावरून भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी वडेट्टीवार यांच्यावर कडाडून टीका केली.
दरम्यान साधू संपत्ती उभारणारे असतात. त्या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. ज्याला जी टीका करायची असेल करा, असं थेट इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे. ओबीसी समाजाने साधूंच्या मागे लागू नये, असेही ते म्हणाले. तसेच साधू समाजाला अंधश्रद्धेत व धर्मांधतेत गुंतून त्यांचं शोषण करतात. त्यामुळे या विरोधात आम्ही बोलणारच,” असंही त्यांनी ठासून सांगितलं.