पाकिस्तानात दूध 140 रुपये प्रति लिटर

पेट्रोल- डिझेलपेक्षाही महागले दर
इस्लामाबाद: पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या शहरात मोहरमनिमित्ताने दूधाच्या किमतीने उच्चांक गाठला. कराची आणि सिंध प्रांतात या दोन दिवसात 120 ते 140 रुपये प्रतिलीटर दूधामागे ग्राहकांना मोजावे लागले. या किमती पेट्रोल-डिझेलच्या किमतीहूनही अधिक होत्या.

मोहरम निमित्ताने अनेक शहरी भागात प्रति लिटर दूधामागे ग्राहकांना मूळ किमतीपेक्षाही अधिक पैसे मोजावे लागले. पाकिस्तानात पेट्रोलची किंमत ही दोन दिवसांत 113 रुपये प्रति लिटर तर डिझेल 91 रुपये प्रति लिटरने उपलब्ध होते. तर, इथल्या माध्यमांच्या माहितीनुसार सिंधमधल्या अनेक भागात 140 रुपये प्रति लिटर दराने दूधाची विक्री होत होती.
मोहरमच्या काळात दूधाची मागणी वाढते, या संधीचा फायदा घेत 120 ते 140 रुपये दराने दूधाची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक दूध विक्रेत्याने स्थानिक माध्यमांना दिली.

मोहरमच्या दिवशी अनेक ठिकाणी छोटे छोटे स्टॉल उभारण्यात येतात. यावेळी दूध, फळांचा रस, पाणी मोफत दिले जाते. दूधाला प्रचंड मागणी असल्याने त्याची किंमत वाढवण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांनी दिली. दूधाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे इफ्तीखार शालवानी यांचे आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. विरोधाभास म्हणजे दूधाचा दर हा आधी 94 रुपये प्रति लिटर ठरवण्यात आला होता. मात्र, मोहरमच्या निमित्ताने दुधाचे दर अचानक वाढवण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×