नवी दिल्ली – एका घरावर विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. देशभरातून या अपघातानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. राजस्थानच्या हनुमानगडमध्ये हा अपघात घडला. या अपघातामध्ये घरातील एक पुरुष आणि एक महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
ज्या घरावर हे विमान पडले ते घर ग्रामीण भागात असून कच्च्या स्वरूपातील होते. अपघातापूर्वी पायलट आणि त्याच्या सहाय्यकाने पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून एक्झिट केली. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन अधिकारी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या या विमानाबाबत फारशी माहिती मिळालेली नाही. हनुमानगड जिल्ह्यातील दाबलीरथन भागात हा अपघात घडला आहे.
#WATCH | Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Hanumangarh in Rajasthan. The aircraft had taken off from Suratgarh. The pilot is safe. More details awaited: IAF Sources pic.twitter.com/0WOwoU5ASi
— ANI (@ANI) May 8, 2023
विमानाच्या स्फोटाचा आवाजही ऐकू आल्याचे घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. अपघातग्रस्त भाग उप-तहसील परिसर बहलोलनगर ते मसरुवाला दरम्यानची आहे. अपघातग्रस्त विमान हे मिग-21 होते. लष्कर प्रशासनाकडून अद्याप विमानाबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अपघाताचे नेमके कारण काय होते याबाबतची माहिती तपासली जात आहे.