नवी दिल्ली – गेल्याच आठवड्यात ट्वीटरने कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सोशल मीडियातील दिग्गज फेसबुकच्या मेटा या पालक कंपनीनेही 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने कंपनीने कामगारांची व्यापक कपात करण्याच्या संदर्भात एक योजना तयार केली आहे.
कंपनीच्या उत्पन्नात होत असलेल्या घटीच्या पार्श्वभूमीवर ही कपात केली जाते आहे. मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये याबाबत सूतोवाच करताना म्हटले की, मेटाच्या इतिहासात केल्या गेलेल्या काही कठिण बदलांची मी माहिती शेअर करतो आहे. आपल्या टीमचा आकार 13 टक्क्यांनी कमी करण्याचा व आपल्या जवळपास 11 हजार प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय मी घेतला आहे.
#DYChandrachud : बोलून नाही, तर काम करून दाखवू; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती
तसेच पुढे त्यांनी खर्चात कपात करण्यासाठी आणि कंपनीला अधिक कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी आणखी काही पाऊले उचलली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.