रियो दी जानेरो :- विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेत स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी याला झालेल्या दुखापतीमुळे अर्जेन्टिनाला फटका बसणार आहे. पेरुबरोबरचा सामना मेस्सी खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
पॅराग्वेला 1-0 असे पराभूत केले होते. मात्र, या सामन्यात दुसरा हाफ सुरु झाल्यावर मेस्सीला स्नायुंच्या दुखापतीमुळे त्रास होऊ लागला होता. त्याला मैदानही सोडावे लागले होते. पॅराग्वेविरुद्धचा सामना होऊन दोन दिवस झालेले असूनही मेस्सी मॅचफिट होणार का याबाबत संभ्रम कायम आहे. येत्या गुरुवारी हा सामना होणार असून त्यापूर्वी मेस्सी तंदुरुस्त व्हावा अशी अपेक्षा अर्जेन्टिनाच्या संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
Los Angeles Olympics 2028 : 128 वर्षांची प्रतिक्षा संपली; अखेर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश #LosAngelesOlympics2028 #T20Cricket pic.twitter.com/Mga4gDM71t
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2023
दरम्यान,अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी पराग्वेविरुद्धच्या विश्वचषक पात्रता फेरीसाठी खेळणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे, असे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी बुधवारी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “आम्हाला पेरूविरुद्ध चार दिवसांत आणखी एक सामना खेळायचा आहे आणि तो उपलब्ध असेल की नाही हे ठरवणे इतके सोपे नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला आरामदायक वाटतं आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. जर तो फिट नसेल तर त्याच्या जागी जो येईल तो सुध्दा चांगली कामगिरी करेल.