मुंबई – अवघ्या काही मिनिटांतच सलमान खानच्या ‘टायगर-3’ (Tiger 3) या चित्रपटाच्या ट्रेलरला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यशराज बॅनरखाली बनलेल्या स्पाय युनिव्हर्सच्या या चित्रपटात बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा त्याच्या अॅक्शन अवतारात परतताना दिसणार आहे. केवळ सलमानच नाही तर त्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी कतरिना कैफही अॅक्शनचा डबल डोस घेऊन येत आहे. मात्र, या सगळ्यामध्ये जर चाहते कोणाच्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतील तर तो होता इमरान हाश्मी.(Salman Katrina)
टायगर-३ (Tiger 3 trailer) मध्ये इमरान हाश्मी पहिल्यांदाच सलमान खान-कतरिना कैफसोबत (katrina kaif) स्क्रीन शेअर करत आहे. जेव्हापासून तो या चित्रपटाचा भाग होणार असल्याची बातमी समोर आली तेव्हापासून चाहत्यांना याबाबतची उत्सुकता लागली होती. आता टायगर 3 चा ट्रेलर शेअर करण्यासोबतच निर्मात्यांनी त्याचा लूकही उघड केला आहे.यासह ट्रेलरमध्ये जोयाचा हटके अंदाज देखील पाहायला मिळत आहे. ऍक्शनसह ट्रेलरमध्ये जोयाचा टॉवेल बोल्डसिन देखील चांगलाच लक्षवेधी ठरला आहे.(Katrina towel seen viral)
टायगर 3 च्या आधी इमरान हाश्मीचा (Imran Hashmi) असा लूक तुम्ही नक्कीच पाहिला नसेल. वाढलेले केस आणि पांढरी दाढी असलेला आणि ओव्हरकोट घातलेला इमरान हाश्मीचा हा लूक आजपर्यंतचा सर्वोत्तम आणि अनोखा लुक आहे. अभिनेत्याच्या लूकसह, निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर देखील जारी केले आहे, ज्यामध्ये तो सलमान खान आणि कतरिना कैफसोबत दिसत आहे.(Joya towel seen)
याआधी टायगरचे दोन भाग आले आहेत, मात्र या तिसऱ्या भागात खतरनाक खलनायक बनलेला इमरान हाश्मी टायगरला कसा हरवणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ‘टायगर’चा बदला घेण्यासाठी कुटुंबाला टार्गेट करणारा इमरान हाश्मी यावेळी सलमान खानसोबत ‘माइंडफुल’ गेम खेळताना दिसणार आहे. लोक आधीच ट्रेलर पसंत करत आहेत, 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या खास प्रसंगी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.