नागपुरात फायरिंग; विरोध करणाऱ्यावर थेट झाडल्या गोळ्या

नागपूर – उपराजधानीत अलीकडील काळात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना आज दारुच्या नशेत एकाने तरुणावर गावठी बंदुकीतून चार गोळ्यांची फायरींग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने दारुच्या नशेत असल्यामुळे नेम चुकला व जीवितहानी टळली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रात्री उशीर सहा आरोपींना अटक केली आहे. हा प्रकार शहरातील गोवा कॉलनी परिसरात घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, या परिसरात काही तरुण गप्पा मारत बसले असताना तेथे दोन दारुडे आले व त्यांनी काही कारण नसताना शिवीगाळ केली. यावरुन एकाचे त्या दारुड्यास हटकले मात्र तरिही त्यांनी शिवीगाळ सुरुच ठेवली दरम्यान संतापलेल्या तरुणाने एका दारुड्या तरुणाच्या कानशिलात लगावली.

त्यानंतर ते दारुडे घटनास्थळावरून निघून गेले मात्र थोड्या वेळाने आपल्या काही मित्रांना घेऊन त्याच ठिकाणी आला आणि पुन्हा शिवीगाळ सुरू केली. तसेच कानशिलात लगावणाऱ्या तरुण समोर येताच दारुड्याने तरुणाच्या दिशेने गावठी बंदुकीतून गोळीबार केला. आरोपीने तरुणाच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. पण आरोपीचा नेम चुकल्याने मोठी हानी टळली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.