नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्या प्रकृती बाबत त्यांच्या मुलीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. मेहबूबा मुफ्ती यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत त्यांची मुलगी म्हणाली, अमित शहाजींचे तुमच्या सरकारचे स्पष्ट धोरण नसून मी दर तासासाठी माझ्या आईसाठी लढा देत आहे. आणि मी जोपर्यंत हे करेल तोपर्यंत प्रत्येक काश्मिरीवरील अत्याचारांबद्दल देखील बोलेल.
HM @AmitShah ji, it’s quite clear your government has no legal or moral constraints. Just want you to know that I will fight for my mother every hour of the day. And while I’m at it, I’ll continue speaking up against the oppression you’ve unleashed on Kashmiris.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) November 6, 2019
त्यांनी दुसर्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काल मी माझ्या आईच्या तब्येतीबाबत शंका व्यक्त केली आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुफ्ती यांच्या कौटुंबिक भेटी कमी व्हाव्यात यासाठी जम्मू काश्मीर राज्य प्रशासनाला आदेश जारी केले. हे सर्व पाहिल्यानंतर आणि समजल्यानंतर मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की हा देश योग्य हातात नाही.
Yesterday, I publicly expressed apprehensions about my mother’s health. A little later the Union Home Minister issued orders to JK state admin to ensure Ms Mufti’s family visits are curtailed. This country is being run by despotic goons trying to break her spirit
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) November 6, 2019