मुंबई – प्रेक्षकांना माझा होशील ना मालिकेतल्या मेघनाचा खूप राग येऊ लागला आहे. आदित्य आणि सईच्या प्रेमात तिची ढवळाढवळ खूप वाढत गेलीये आणि ती आदित्यशी थेट साखरपुडा उरकायला आलीये. ह्याबद्दल प्रेक्षक मेघनाच्या वागणूकीवर नाराज आहेत.
सई-आदित्यला वेगळं करायला आतूर झालेल्या मेघनाला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय, पण अश्यातच आता माझा होशील ना मालिकेत अनपेक्षीत वळण येणार असून मेघना आदित्यशी ठरलेला साखरपुडा मोडणार आहे.
त्याचं कारण काय? खरंच ती आदित्यचा नाद सोडून देणार? की ही तिची काही नवीन खेळी असणार? हे अजून गुलदस्त्यातच आहे. ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी बघावा लागेल, २६ जानेवारीचा “माझा होशील ना” मालिकेचा भाग.