न्यूयॉर्क – शोध पत्रकारितेबद्दल मूळ भारतीय वंशाच्या पत्रकार मेघा राजगोपालन यांना पुलीत्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. चीनच्या एका प्रांतात मुस्लिमांवर केल्या जाणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी गुप्त माहिती मिळवून ती एका पुस्तकाद्वारे जाहीर केली होती. त्या कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या बजफीड न्यूजमध्ये काम करतात.
पुलीत्झर हा पत्रकारितेतील मानाचा पुरस्कार समजला जातो. या खेरीज नील बेदी याही मुळ भारतीय वंशाच्या पत्रकाराला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्थानिक रिपोर्टिंगबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
बेदी व कॅथलीन मॅकग्रोरी यांनी संयुक्तपणे हा पुरस्कार मिळवला आहे. बेदी टम्पा बे टाइम्स या दैनिकांत शोध पत्रकार म्हणून काम करतात. मेघा राजगोपालन यांना आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगबद्दल हा पुस्कार मिळाला आहे.