करोनावरील लसीसाठी रशियात वैद्यकीय चाचणी पूर्ण

बीजिंग/मास्को – करोनावरील लसीचे उत्पादन काही देशांमध्ये सुरू होत आहे. रशियाने करोनाविरुद्धच्या लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. रशियाच्या सेचोनोव युनिव्हर्सिटीने हा दावा केला आहे. या लसीची मानवी चाचणीही यशस्वी झाल्याचे युनिव्हर्सिटीने सांगितले आहे.

रशियातील इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन ऍण्ड बायोटेक्‍नॉलॉजीचे संचालक वदिम तरासोव यांनी दिलेल्या माहितीनुसार युनिव्हर्सिटीने 18 जूनला गेमली इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या लसीचे परीक्षण सुरू केले आहे. सेचोनोव युनिव्हर्सिटीने पहिल्या लसीचे स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या परीक्षण केले. कोरोना लसीवर काम सुरू केले आहे. चाचण्यामधील स्वयंसेवकांच्या दुसऱ्या समुहाला 20 जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात येणार आहे, असे सेचोनोव युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी, ट्रॉपिकल ऍण्ड वेक्‍टर-बॉर्न डिसीजचे संचालक अलेक्‍झांडर लुकाशेव म्हणाले.

दुसरीकडे चीनमध्ये कॅन्सिनो बायोलॉजिक्‍स नावाची कंपनी परदेशात लसीची मोठी चाचणी घेण्यासाठी रशिया, ब्राझील, चिली आणि सौदी अरेबियाशी चर्चा करीत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, चीनमध्ये करोना संसर्ग खूप कमी झाला आहे. मात्र, लसीच्या चाचण्यांसाठी अशा भागातील स्वयंसेवकांवर चाचणी करावे लागते, जेथे करोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे चीनने परदेशात लसीची चाचणी करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.