मुंबई – मराठीत चित्रपटात काम करून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केल्यानंतर सई ताम्हणकरने बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली. ‘गजनी’सारख्या मोठ्या चित्रपटात छोटी भूमिका साकारत सईने आपल्या हिंदीतील अभिनयाला सुरुवात केली.त्यानंतर अनेक दर्जेदार हिंदी सिनेमांमध्ये ती दिसून आली. असं असलं तरी एका पुरस्कार सोहळ्यात सईबाबत एक प्रकार घडला आणि ती दुखावली गेली. याबाबत स्वतः सईने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
एका हिंदी मुलाखतीमध्ये सईला विचारण्यात आले,तुझ्यासोबत असं कधी झालाय का ? तू रेड कार्पेटवरून एखाद्या कार्यक्रमासाठी पोहचली मात्र त्यावेळी कॅमेरवाल्यांनी कॅमेरे वळवले. त्यावर उत्तर देताना सई म्हणते,हो अस झालय. नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान असं झाल्याचे सई सांगते. मी जेव्हा कॅमेऱ्यासमोर पोहचले तेव्हा काही मीडिया इन्फ्ल्यूएंसरने माझ्यावरून कॅमेरे वळवले असा खुलासा सईने यावेळी केला मात्र तिने यावेळी कोणाचेही नाव घेण्यास नकार दिला.
यामुळे वाईट वाटल्याचे देखील सई सांगते. तसेच अशा इन्सिडेंटमुळे नवीन आणि चांगलं काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते असं सई सांगते. तसेच अशा प्रकारांना आपण आपल्या कामानेच उत्तर देऊ शकतो एक दिवस असा येईल की हे लोक माझ्यासाठी थांबलेले असतील आणि मी तेथून निघून जाईल असा विश्वास यावेळी सईने व्यक्त केला.
View this post on Instagram
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिमी’ या चित्रपटासाठी सईला आयफा फिल्मफेअरने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी पुरस्कार समारंभासाठी ती पोहचली असता हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या मुलाखतीचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.