मुंबई – अभिनेत्री सई ताम्हणकर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. सईला आजवर तिच्या हटके अभिनयासाठी ओळखले जाते. मराठीमध्ये नो एंट्री चित्रपटात सईचा बोल्डनेस पाहून अनेकजण थक्क झाले होते. त्याच बोल्डनेसमुळे सई पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.
सईचा हा बोल्ड अवतार कोणत्या नव्या चित्रपटासाठी नसून तो एका मॅगझीनसाठी आहे. वुमन फिटनेस या मॅगझीनसाठी सईने हे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये सईचा हॉट बिकिनी अंदाज लक्षवेधी ठरतोय. अनोख्या बोल्ड स्टईलचा आपला लूक सईने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक कॉश्यूममध्ये दिसून येते. वुमन फिटनेस या मॅगझिनचे कव्हरपेजच यावेळी सईने शेअर केले आहे.
View this post on Instagram
वुमन फिटनेस’च्या कव्हर पेजवर फोटो झळकल्यामुळे कायम शारीरिक सुदृढता जपण्याची ताकद मला मिळाली आहे असं म्हणत सईने आरोग्याचे महत्व सांगण्याचा प्रयत्न यावेळी केला आहे. सई वारंवार बोल्ड लूकमध्ये दिसत असली तरी चाहत्यांनी तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले आहे. म्हणूनच सईच्या इंडिया लॉकडाऊन या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.