मुंबई – मराठीत चित्रपटात काम करून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केल्यानंतर सई ताम्हणकरने बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली.‘गजनी’सारख्या मोठ्या चित्रपटात छोटी भूमिका साकारत सईने आपल्या हिंदीतील अभिनयाला सुरुवात केली.त्यानंतर अनेक दर्जेदार हिंदी सिनेमांमध्ये ती दिसून आली. सई सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. तिने नुकताच एक फोटो शेअर केला होता ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
सईने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आणि तिचा चर्चित बॉयफ्रेंड अनिश जोग दिसत आहेत. फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या क्लोज बसलेले दिसत असून दोघांनी गॉगल्स घातले आहेत. दोघेही अगदी हॅप्पी स्माईल करताना दिसत आहेत. परंतु सोशल मीडियावर चाहत्यांनी या दोघांच्या नात्याबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.
अनेकांनी सईची या फोटोमधील स्टाईल चांगलीच आवडली आहे. तर काहींनी अनिशवर कॉमेंट करत सईला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चांगल्या मुलींना विमलवाले आवडतात’ अशी कॉमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्याने ओळखा कोणाचा हात कोणता ? असा सवाल विचारला आहे. अनिशने अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. सईने अनिशच्या ग्रलफ्रेंड,धुरळा,टाइम प्लिज अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.