मुंबई – बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर हे चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या लाल बत्ती या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. नाना पाटेकर बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहेत. नाना लवकरच प्रकाश झा यांच्या लाल बत्ती या वेबसिरीजमध्ये दिसणार आहेत.
View this post on Instagram
नाना पाटेकर यांनी आपण प्रकाश झा यांच्या लाल बत्ती या वेबसिरीजमध्ये काम करणार असल्याची घोषणा केली आहे. लाल बत्तीमध्ये नाना पाटेकरसोबत मेघना मलिकही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत मेघना नाना पाटेकर यांच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे.