मॉस्को: भारताची अव्वल मुष्टियुद्धपटू सुपर मॉम मेरी कोम हिने महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या स्पर्धेवर सातत्याने वर्चस्व राखणाऱ्या मेरीने याही स्पर्धेतील पदक निश्चित केले आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेरी कोमने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या इंग्रीद व्हॅलेन्सिया हिला 5-0 असे पराभूत केले. या विजयासह मेरी कोमने स्पर्धेतील आपले आठवे पदक निश्चित केले आहे.
यापूर्वी मेरी कोमने 48 किलो वजनी गटात सहा सुवर्णपदके आणि सहा रौप्यपदके जिंकली आहेत. मात्र, मेरी कोम यंदा पहिल्यांदाच 51 किलो वजनी गटातून खेळत आहे.
उपांत्य फेरीत मेरी कोम हिच्यासमोर द्वितीय मानांकित टर्क बुसेनाझ कॅगिरोगलू हिचे कडवे आव्हान राहणार आहे. या स्पर्धेपूर्वी मेरिने युरोपियन स्पर्धेचे विजेतेपद तिने मिळवले होते. त्यामुळे उपांत्य फेरीत विजय मिळवित ती सुवर्णपदक मिळविते का हाच प्रश्न आहे.
दुसरीकडे भारताच्या लवलीना बोरगोहेन हिनेदेखील 69 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. तिने मोरक्कोच्या बेल अहिबिबचा 5-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना बेलारूसच्या युलिया अपानासोविच हिच्या विरुद्ध होईल.