सोशल मीडियावर मीम्सचा कहर

पुणे – लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. या निकालाचा बोलबाला सोशल मीडियावर आहे. या निवडणुकीत भाजपने विरोधी पक्षांचा धुव्वा उडविला असून नेटीझन्सकडून सोशल मीडियावर “मीम्स’चा पाऊस पाडून विरोधकांची खिल्ली उडविली जात आहे.

या पराभवाचा व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम यासारख्या सोशल ऍप्सवर नेटीझन्सकडून विरोधीपक्षांची खिल्ली उडविणाऱ्या “मीम्स’नी धुमाकूळ घातला आहे. म्हणी, चित्रपटांचे संवाद, चारोळ्या आदींचा वापर करून विरोधकांना हिणवणारे आणि हास्यास्पद टिप्पणी करणारे “मीम्स’ सुपरहिट ठरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरून “ईव्हीएम’ नाही रे वेड्या, मी डायरेक्‍ट हृदय हॅक करतो’, “वो चायवाला..और हम चाय प्रेमी कैसे जाने देते’ हे “मीम्स’देखील भाव खाऊन गेले. याशिवाय प्रस्थापित आणि बड्या चेहऱ्यांच्या पराभवाबाबत नेटीझन्सने सोशल मीडिया गाजवले. नेटिझन्सनी सोशल मीडियावर 300 पेक्षा जास्त धावा केलेल्या क्रिकेटर्सना देखील सोडले नाही. विराट कोहली आणि नरेंद्र मोदी यांचा हस्तांदोलनाचा फोटो असलेल्या “अब तेरी बारी है छोटे’ या “मीम’ने क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावर हसू “फुलवले’.
पारले-जी बिस्कीट पॅकिंगवर राहुल गांधींचे चित्र लावून “हरले-जी’ करण्यात आले. इतकेच नव्हे, तर चक्क पद्मावती चित्रपटाच्या पोस्टरवर दीपिकाऐवजी राहुल गांधीचे चित्र लावून पोस्टरचे नावच “सद्‌मावती’ झाले. याचबरोबर “महागठबंधनाचा’ फोटो वापरून “बडे दुःख के साथ सूचित करना पड रहा है की हिंदुस्तानने एक साथ 22 प्रधानमंत्री खो दिये है’ हे वाक्‍य चांगलेच गाजले.

राज ठाकरे “टार्गेट’
लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसलेल्या राज ठाकरेंना नेटीझन्सने चांगलेच टार्गेट केले. राज यांच्या “लाव तो व्हिडिओ’ या वाक्‍याचा उपरोधिक वापर केलेले “बंद करा रे तो टीव्ही’ हे “मीम्स’ “स्टेटस’वर झळकले. याचबरोबर “ए लाव रे तो व्हिडिओ….मोदी जिंकल्याचा’, “लाव रे फटाके’, “लाव रे न्यूज चॅनेल’, “कृष्णकुंजवर राज ठाकरे आघाडीवर’ यासारख्या आदी वाक्‍यांनी राज यांना चांगलेच “ट्रोल’ केले आहे.

झळकलेले “मीम्स’
– “”त्सुनमो”
– “आज दो फिल्म रिलीज होगी… “मोदी रिटर्न्स’ आणि “एक थी कॉंग्रेस’
– कमळ तर फुलणारच होते, महागठबंधनाने चिखलच इतका छान केला होता.
– आजी मोदी याचा दिनू…. रडे सोनियांचा सोनू
– राहुल गांधींने की चुनाव आयोग से शिकायत…
– कहा नरेंद्र मोदी रात को सपने में आकर बोलते है ……..
“”कान्यो मान्यो कुर्ररररर.. अबकी बार कॉंग्रेस फुर्ररर…
– आरंभ हे प्रचंड…
– आज देशाला फरक कळला, एखाद्याने “ध्याना’ला बसणे आणि एखाद्याच्या विरोधासाठी काही “ध्यानां’नी एकत्र येणे..
– नागरिकशास्त्रात शिकवलं होतं की सगळे खासदार मिळून पंतप्रधान बनवतात.. पण 2019 मध्ये एका पंतप्रधानाने सगळे खासदार बनवले.
– कितना भी कर लो हाहाकार …नही बदलेगा चौकीदार …फिर एक बार मोदी सरकार
– सबका साथ + सबका विकास + सबका विश्‍वास = विजयी भारत

निकालापूर्वी हिट झाल्या या ओळी
– जस्ट आस्किंग….
अगर अमेठी से राहुल हार जाता है और वायनाड से जीत जाते है, तो “ईव्हीएम’ खराब मानी जाएगी?
– अब आएगा…चौकीदार-2
– 15 लाख घेतल्याशिवाय मोदींना सोडणार नाही ही जनता…

सोनिया गांधी राहुल गांधींना कडेवर घेऊन रेल्वेमध्ये चढतात. तेवढ्यात पाठीमागून अखिलेश यादव सायकलवरून येतात. मागे ममता बॅनर्जी या देखील पळत येताना पाहिल्यावर राहुल त्यांना रेल्वेमध्ये खेचतात. त्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि अरविंद केजरीवाल पळत पळत सुटकेस घेऊन रेल्वेमध्ये प्रवेश करतात. तेवढ्यात राहुल खाली पडतात आणि पुन्हा पळत येऊन रेल्वेमध्ये चढतात आणि थेट रेल्वेच्या टपावरच जाऊन उभे राहतात. त्यांचा पाठलाग करत अन्य पक्षाचे प्रमुख टपावर येतात, आणि एका रांगेत उभे राहिल्यानंतर, निवडणुकांच्या निकालाप्रमाणे एक-एक जण पुढे जाऊ लागतो. शेवटी राहुल गांधी पुढे येतात. ही रेल्वे जवळ आल्यानंतर तेथे स्टेशनवर असलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ट्रॅक बदलतात आणि रेल्वे जिंकण्याचा ट्रॅक सोडून दुसऱ्याच ट्रॅकवर जाते आणि त्या ट्रॅकचा शेवट “डेड’ या पाटीपर्यंत पोहोचतो.

हे वर्णन आहे, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचे… निकालांच्या पार्श्‍वभूमीवर या व्हिडीओने नेटिझन्सची वाहवा मिळविली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)