मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठी दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि त्यांचा टीडीएम सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. मराठी सिनेमाला स्क्रिन्स मिळत नसल्याचे सांगत कऱ्हाडे यांनी प्रदर्शित झालेला सिनेमा मागे घेतला. त्यानंतर कऱ्हाडे यांनी सिनेमा पुन्हा रिलीज करणार असल्याचं सांगितलं. मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसल्याने अनेकांनी कऱ्हाडे यांच्याबाजून आवाज देखील उठवला. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
टीडीएम चित्रपटात काम केल्या अभिनेता ऋषी काळे याने सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी या चित्रपाटाचे कौतुक करत मी आणि अजितदादाने हा चित्रपट पहिला आहे तुम्हीही पहा असं आवाहन देखील केलं आहे. सुळे यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून याबाबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
सुप्रिया सुळे या पोस्टमध्ये म्हणतात.आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याचे सुपुत्र आणि विद्या प्रतिष्ठानचे माजी विद्यार्थी ऋषि विलास काळे यांची भेट झाली. ऋषी लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या टि.डी.एम. या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. भेटीदरम्यान त्याचा कलाक्षेत्रातील प्रवास जाणून घेऊन त्याचे अभिनंदन केले. त्याला ९ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. आपणही सर्वांनी हा चित्रपट नक्की पहा !”
View this post on Instagram
ख्वाडा आणि बबन या चित्रपटात सामाजिक भान जपून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कऱ्हाडे यशस्वी झाले होते. त्यामुळे टीडीएमकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या आहेत. टीडीएमचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली होती.ग्रामीण भागातील तरुणाची कथा सांगणार हा सिनेमा येत्या ९ जून रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.