मुंबई – दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या चित्रपटातील दमदार ऍक्शन सीनसाठी ओळखला जातो. चित्रपट सुपरहिट होण्यासाठी रोहित शेट्टी कधी चारचाकी कार्स उडवतो तर कधी बसेस फोडतो. कॉमेडीसह ऍक्शनचा तडका दिल्याशिवाय रोहित शेट्टीचा चित्रपट पूर्ण होत नाही. गोलमाल,संडे,सिंघम,सिम्बा असे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीच्या सेटवरील एक ऍक्शन सिन सध्या सोशल मिडीआयवर चांगलाच व्हायरल होतोय.
‘इंडियन पोलीस फोर्स’ या आगामी सीरिजमधील एक ऍक्शन सिन सध्या व्हायरल होतोय. रोहित शेट्टीने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याबाबत चांगलीच चर्चा सुरु केल्याचे पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये एक पिवळ्या रंगांची कार भरधाव वेगात येऊन एका दुसऱ्या कारवर जाऊन आदळते. यानंतर रोहित शेट्टी स्वतः एका ओपन जीपमधून आल्याचे पाहायला मिळते.
रोहित शेट्टीने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. कारचा हा प्रघात सिन पूर्ण होताच रोहित शेट्टी स्वतः शॉट ओक असल्याचे सांगताना व्हिडिओमध्ये दिसून येते. हैद्राबाद येथे इंडियन पोलीस फोर्स सीरिजचे शूटिंग सुरु असून त्या दरम्यान दाखवण्यात येणारा हा ऍक्शन सिन असल्याचे समजते.
View this post on Instagram
‘बॅक टू आवार ओल्ड बिजनेस.. आता येणाऱ्या दोन वर्षांमध्ये फाडून टाकू .. यामध्ये कोणतेही व्हिज्युअल इफेक्ट नाहीत सर्वकाही रियल आहे. असं कॅप्शन यावेळी रोहित शेट्टीने दिले आहे. या सिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉयसह अभिनेत्री शिल्पा शेट्टी दिसणार आहेत. तसेच रोहित शेट्टीची ही पहिलीच वेब सिरीज असणार आहे.