मुंबई – छातीमध्ये दुखू लागल्यामुळे दोन दिवसांपूर्वी (18 जुलै) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्रकृती उत्तम असून हाॅस्पिटलमधून डिस्जार्ज देण्यात आला आहे.
छातीत दुखू लागल्याने त्यांना रविवारी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. दोन दिवसांच्या उपचारानंतर किशोर पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
‘ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते’, असे ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हंटले.