मुंबईत भाजप-शिवसेना युतीची घोषणा होणार ?

मुंबई – भाजप आणि शिवसेना हा दोन्ही पक्ष आमच ठरलय अशी घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून करत आहेत. आज हे दोन्ही पक्ष युतीचा निर्णय जाहिर करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची आघाडी आणि जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला आहे. भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? झाली तर जागावाटप कस करण्यात येणार ? मित्रपक्षांना किती जागा दिल्या जाणार? दोन्ही पक्षांच्या जागा समान असणार का? याची उत्तरे आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मिळू शकतील अशी शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला. आता ही निवडणूक रंगतदार होणार यात काहीही शंका नाही. मात्र युतीचा निर्णय झाल्याशिवाय जागावाटप होणार नाही. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.