कामशेत – मावळ तालुक्यातील लोहमार्गाजवळ असणारी आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ या दुर्गम व डोंगराळ भागात पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक अपरिचित निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पावसाने दडी मारल्यानंतर मुख्य पिक असलेल्या भातावर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता होती. मात्र, पावसाच्या दमदार पुनरागमनाने पिकांना जीवदान मिळाले असून, पवन मावळातील सौंदर्य बहरले आहे. पवन मावळच्या परिसरातील वाऱ्यावर डोलणारे हिरवेगार भाताची खाचरे लक्ष वेधून घेत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पवना परिसर हा पर्यटकांना भुरळ घालणारे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ल्याबरोबर पवना धरणाचा परिसर पर्यटकांना खेचून आणत आहे. लोणावळ्याहून लोहगड खिंडीमार्गे पंधरा किलोमीटरवर अंतरावर पवना धरण आहे. डोंगर फोडून तयार केलेली दुधिवरे खिंड पाहण्यासारखी आहे. पवना धरणाच्या भिंतीजवळ गेल्यानंतर आपल्याला पवना धरणाचा अथांग जलाशय दिसतो. सर्व बाजूने जणू शिलेदार म्हणूनच तिकोना, तुंग, लोहगड विसापूर उभा असल्याने पर्यटकांची गर्दी होत आहे.
ऐतिहासिक बौद्ध लेणींचे मनोहारी दृश्य
बेडसे येथील प्राचीन बौद्धलेणी पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जात असतात. येथे असणाऱ्या धबधब्यांचीही मजा पर्यटक घेताना दिसतात.
मागील आठ दिवसांपासून पडत असलेल्या, संततधार पावसाने ठरळप आंदर मावळ चर्रींरश्र भागामधील धबधबे थरींशीषरश्रश्री डोंगरदऱ्या मधुन वाहू लागले आहे. यामुळे आंदर मावळचा निसर्ग खुलला आहे. रिम- झिमत्या पावसामुळे, धबधब्यांमुळे, हिरव्यागार झाडां-झुडपांमुळे, धुक्याने आंदर मावळचे निसर्ग सौंदर्य उठून दिसत आहे.
मावळातील अर्थकारण पर्यटनावर अवलंबून
मावळ निसर्ग संपदेने समृद्ध आहे. येथील अर्थकारण मावळच्या ग्रामीण भागातील प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागात मोठी आर्थिक उलाढ्राल स्थानिकांना दिलासा देणारी ठरत आहे. टुरीस्ट, टॅक्सी, रिक्षा, हॉटेल, रेस्टॉरंट अशा रोजगाराच्या अनेकसंधी उपलब्ध झाल्या आहेत.
धार्मिक पर्यटनाचीदेखील संधी
दुधिवरे खिंडीजवळ प्रतिपंढरपूर साकारले आहे.येथील. येथील मंत्रमंदिर पाहण्यासारखे आहे. येथून लोहगडचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. किल्यावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. जवणमार्गे वाघेश्वरला जाता येते. येथे वाघेश्वराचे मंदिर आहे. पवना धरण शंभर टक्के भरल्याने मंदिर पाण्याखाली आहे. ग्रामस्थांनी मंदिराची प्रतिकृती धरणाच्या काठावर वसविलेली आहे.