मुंबई – टेलिव्हिजन नंतर मोठ्या पडद्यावर आपले करियर करत असलेली अभिनेत्री ‘मौनी रॉय’ हीने एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या मुलांसोबत यंदाचा नाताळ सण साजरा केला. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तिने सॅन्टाक्लॉजची लाल, पांढऱ्या रंगाची टोपी घातली असून, यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तसेच, मौनीने फोटोखाली एक भावनिक नोटसुद्धा लिहिली आहे.
View this post on Instagram
Outfit @Raishmacouture Style my @anusoru Hair & Make up @cashmakeupartistry ? @shutterstrings
मौनीने पोस्ट मध्ये लिहले कि, “एचआयव्हीला टॅबू न मानता, स्पर्श केल्याने प्रेम पसरतं.” यावेळी मौनीला तिच्या शालेय दिवसातील सीक्रेट सँटाची आठवण झाली. असे तिने लिहिले आहे. बॉलिवूड मध्ये सर्च सेलिब्रिटी दरवर्षी नाताळ सण साजरा करताना दिसतात.