आळंदी – येथील श्रीगुरुहैबतराव बाबा दिंडीत माउलींचा वीणा पायी वारीत पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, देहू आणि पिंपळनेर वारीत परंपरेने असतो. यापूर्वीचा वीणा अनेक वर्ष सेवारत असल्याने नवा वीणा माउली भक्त अविनाश कुलकर्णी यांनी दिला.
जुना व नवा अशा दोन्ही वीणा पूजन करून नवीन वीणाचे “श्रीं’च्या संजीवन समाधी पुढे वीणाची विधिवत पूजा करून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीकडे सुपूर्त केला. तर देवस्थानकडून पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तो स्वीकारला.
यावेळी स्वामी सुभाष महाराज, डी. डी. भोसले पाटील, व्यवस्थापक माउली वीर आदी उपस्थित होते. आळंदी यावेळी वेदमूर्ती मंदार जोशी यांनी विधिवत पूजेचे पौरोहित्य केले. “श्रीं’च्या वारीतील विणा अनेक वर्ष सेवारत होता. पुरातन झाल्याने वीणा या पिंपळनेर वारी पूर्वी बदलणे निकडीचे असल्याचे स्वामी सुभाष महाराज यांचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पालखी सोहळ्याचे मालक, आळंदी देवस्थान आणि माउली भक्त अविनाश कुलकर्णी यांचे सहकार्याने संवाद साधून वारी पूर्वी नवा वीणा “श्रीं’च्या सेवेत रुजू केला.