वैद्यकीय सेवेत मातोश्री ग्रुपची उत्तुंग भरारी

मातोश्री हॉस्पिटलच्या एमजीएम डेंटल विभागाचे आज उद्घाटन
सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय सेवा : नवाज सुतार

कराड (प्रतिनिधी) – समाजाप्रती संवेदनशील राहून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांना सोयी-सुविधा पुरवणे हे ध्येय बाळगलेल्या मातोश्री ग्रुपने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक पाऊल उचलले आहे. ईद-ए-मिलादचे औचित्य साधून मातोश्री हॉस्पिटलच्या एम. जे. डेंटल विभागाचे शुक्रवार, दि. 30 रोजी दुपारी तीन वाजता उद्‌घाटन होणार आहे. सर्वसामान्यांना माफक दरामध्ये वैद्यकीय सेवा देण्याचा मानस मातोश्री ग्रुपचे प्रमुख नवाज सुतार यांचा आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारे कराड हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श आहे. यामागे अनेकांचे विचार, काम, आदर्श इ. लपलेले आहेत. याच कराडमध्ये नवाज सुतार यांनी मातोश्री ग्रुप आणि जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून सामाजिक कार्य चालू केले. महापुरुषांचे विचार स्वतः आचरणात आणून त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. बेरोजगार युवकांना नोकरी, रोजगार उपलब्ध करून देणे, गोरगरीब लोकांना मदत करणे, समाजोपयोगी विविध कार्यक्रम राबवणे हे कामे गेली 10 वर्ष चालू आहे. हे करत असताना आणि पूर्ण जगावर करोना हे संकट आले असताना नवाज सुतार यांचे मदत कार्य चालूच होते. पण त्यांच्या लक्षात आले की, करोनाच्या भितीमुळे कराडमधील 90 टक्के दवाखाने बंद आहेत. त्यामुळे लोकांना प्राथमिक उपचार मिळत नाहीत. लोक भीतीखाली आहेत. म्हणून नवाज सुतार यांनी स्वतः खिदमत-ए-खल्क क्‍लिनिकची सुरुवात करून जास्तीतजास्त लोकांना करोनाच्या संकट काळात लोकांना प्राथमिक उपचार उपलब्ध करून दिले. हे काम चालू असताना आत्ता लोकांच्या सेवेसाठी मातोश्री ग्रुपच्यावतीने डेंटल केअर या नव्या उपक्रमाची सुरुवात करत आहे. तरी सर्व घटकांतील लोकांनी याचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मातोश्री ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे.

कराडचा प्राचीन काळापासून बाजारपेठेचे गाव म्हणून लौकिक आहे. या गावाला समाजकार्याची फार मोठी परंपरा आहे, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि कराडचे भाग्यविधाते स्व,यशवंतराव चव्हाण यांनी समाजकारण व समाजसेवेचा वसा कराडला दिला, गुरूने दिला समाजरुपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसाफ या उक्तीप्रमाणे नवाज सुतार यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मातोश्री ग्रुप हे रोपटं लावलं,त्यांच्या अथक परिश्रमातून या रोपट्याचे रूपांतर एका उद्योगसमूहात होत आहे,विविध माध्यमातून माफक दरात समाजाला सेवा देण्यासाठी हा ग्रुप धडपडतोय,

करोनाचे न भूतो न भविष्यती असे संकट अवघ्या मानवसमूहावर आले,याकाळात असलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेकांचे रोजगार गेले,त्यांच्या खाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला, आशा संकटसमयी मातोश्री ग्रुप पहाडासारखा त्यांच्या पाठीशी उभा राहिला, या सम्पूर्ण काळात रोज असंख्य कष्टकर्यांना दोन वेळचे भोजन घरपोच करण्याचे काम नवाज सुतार यांनी केले,

कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये अनेक दवाखाने बंद राहिल्याने वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला,कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले,लोंकांची ही अडचण ओळखून मातोश्रीने खिदमत -ए-खल्कफहे क्‍लिनिक बाहयोपचारासाठी सुरू केले,केवळ दहा रुपयात मिळणाऱ्या या उपचारांचा लाभ अनेक गरजू रुग्णांनी घेतला, आता मातोश्री ग्रुपमार्फत एम,जी,डेंटल केअरफ यानावे नवीन दातांचा दवाखाना ईद-ए-मीलाद मचे औचित्य साधून शुक्रवार दि,30ऑक्‍टोबर पासून रुग्णांच्या सेवेत दाखल होत आहे, सर्व लोकांनी माफक दरात दिल्या जाणाऱ्या या सेवेचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.