“मास’तर्फे मंगलमूर्ती हॉस्पिटलला दोन व्हेंटिलेटर मशीन

सातारा (प्रतिनिधी) – मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ साताराने (मास) करोना संकटात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. जमा झालेल्या देणगीमधून मासतर्फे दोन व्हेंटिलेटर मशीन श्री मंगलमूर्ती क्‍लिनिक ऍन्ड रिसर्च सेंटर प्रा. लि. सातारा व साईअमृत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडे जमा केले.

“मास’ने नेहमीच सातारा जिल्ह्यातील उद्योजकांच्या सहकार्याने लोकोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. पूरस्तिथी असो अथवा कोविड-19 संकटाच्या काळात “मास’ मदतीसाठी अग्रेसर राहिले आहे. सातारा जिल्ह्यातील उद्योजक कायम समाजाच्या व प्रशासनाच्या मदतीला धावून जात असतात. कोविड-19 विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकर सुधारावी, यासाठी सर्व उद्योजक प्रशासनास असोशिएशन मार्फत अथवा आपापल्या परीने वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत करत आहेत.

कोविड-19 विषाणूमुळे वाढती रुग्ण संख्यांची दखल घेऊन व कोविड-19 विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकर सुधारावी, यासाठी मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत उद्योजकांना आवाहन केले होते. त्या उत्स्फूर्त सहभागातून जमा झालेल्या देणगीमधून “मास’तर्फे दोन व्हेंटिलेटर मशीन मंगलमूर्ती क्‍लिनिक ऍन्ड रिसर्च सेंटर प्रा. लि. सातारा व साईअमृत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपी यांच्याकडे “मास’चे अध्यक्ष उदय देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, सचिव धैर्यशील भोसले, खजिनदार भरत शेठ, सहसचिव दीपक पाटील, माजी अध्यक्ष व जेष्ठ उद्योजक दिलीप उटकूर, उद्योजक दत्ताजी थोरात, प्रसन्न देशमुख, “मास’चे पदाधिकारी, उद्योजक यांच्या उपस्थितीत मासभवन, सातारा येथे लोकार्पण करण्यात आल्या, अशी माहिती सचिव धैर्यशील भोसले यांनी दिली.आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.