दिल्ली – दयालपूर ठाण्याच्या हद्दीत मोठी दुर्घटना घडली आहे. चांद बाग येथील ई-9 तळघरातील एका लॅपटॉप सेल फॅक्ट्रीत आग लागून एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर तीन तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
मात्र बचाव पथकाला घटनास्थळी एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. बेसमेंटच्या बाथरूममध्ये तिचा मृतदेह आढळला. या महिलेचे नाव माया गोविंद राम (वय 30) असं असून ती दिल्लीची आहे. ही महिला लॅपटॉप सेल फॅक्ट्रीमध्ये काम करत होती.
दिल्ली के चांद बाग के ई-9 में बेसमेंट में लैपटॉप सेल फैक्ट्री में आग लगने की सूचना मिली थी। दमकल की गाड़ियों को आग पर काबू पाने में करीब तीन घंटे लगे, जिसके बाद बेसमेंट के बाथरूम में एक 30 साल की माया नामक महिला का शव मिला। वह लैपटॉप सेल फैक्ट्री में लेबर के तौर पर काम कर रही थी।…
— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2023
या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जीबीटी रुग्णालयात पाठवला आहे. गुन्हे शाखेच्या टीमने घटनास्थळी पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 304ए आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.