सौदी अरेबियात भीषण अपघात : 35 विदेशी भाविकांचा मृत्यू

मदिना : मदिना शहरात एक बस आणि एका अवजड वाहनामध्ये झालेल्या धडकेत 35 विदेशी भाविकांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सौदीच्या सरकारी माध्यमांनी आज सकाळी ही माहिती दिली. मदिना पोलिसांच्या प्रवक्‍त्यांनी, सौदी अरेबियाच्या पश्‍चिम शहरात बुधवारी हा अपघात झाला. यामध्ये एक खासगी चार्टर्ड बस आणि एका अवजड वाहनामध्ये टक्कर झाली असल्याचे म्हटले आहे.

अपघातग्रस्त लोक हे अरब आणि आशियाई भाविक होते. जखमींना अल हमना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी याचा तपास सुरु केला असल्याचेही पोलिस प्रवक्‍त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.