“हम वादे नही इरादे लेकर आये है’

झोपडपट्टीधारकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविणार

हडपसर – गेल्या 50 वर्षांपासून हडपसर विधानसभा मतदारसंघ मूलभूत नागरी सुविधांसह विकासापासून वंचित होता. मात्र, मागील पाच वर्षांत हडपसरचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी केंद्र-राज्य सरकार, महापालिका, जिल्हा नियोजन समितीकडे सतत पाठपुरावा करून 7 हजार 95 कोटी रुपयांचा निधी आणून विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. आता मला हडपसरचे नंदनवन करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, कारण हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी “हम वादे नहीं, इरादे लेकर आये है’ असे प्रतिपादन आमदार योगेश टिळेकर यांनी केले आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघ भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे उमेदवार तथा भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश (अण्णा) टिळेकर यांच्या प्रचारार्थ रामटेकडी येथे सभा आयोजित केली होती. यावेळी टिळेकर म्हणाले, जनता ही माझी ताकद असून विकास हाच प्रचार आहे. त्यामुळे केवळ विकासाच्या विषयावरच आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आजपर्यंत मी केलेली कामे जनतेच्या लक्षात येत असल्यानेच विविध स्तरांतून महायुतीला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आपला विजय निश्‍चित आहेत. रामटेकडी परीसरातील झोपडपट्टी धारकांसासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवून तेथील गोरगरीब-सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या हक्काची पक्की घरे देण्याचा आपला संकल्प आहे, असे आमदार टिळेकर म्हणाले.

हडपसर मतदारसंघातील क्रांती सामाजिक संस्थेने आमदार टिळेकर यांना बिनशर्त पाठींबा दिला. यावेळी संघटेनेचे संस्थापक- अध्यक्ष खन्नासिंग कल्याणी, उपाध्यक्ष भगतसिंग कल्याणी, चॉंदसिंग कल्याणी, शक्तिसिंग कल्याणी, वैशाली शिंदे, नाशरजंग हक्काणी, डॉ. ज्ञानोबा मुंडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.