नवी दिल्ली, दि.22- कच्च्या मालाचे दर वाढले असल्याचे कारण सांगून मारुती सुझुकी कंपनीने एप्रिल महिन्यात काही मॉडेलच्या दरात वाढ जाहीर केली आहे. याच कारणासाठी कंपनीने जानेवारी महिन्यातही दरवाढ केली होती.
कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या म्हटले आहे की, कार तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध कच्च्या मालाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे यातील काही भाग ग्राहकाकडून घेणे आवश्यक झाले आहे.
ही वाढ सरसकट करण्यात येणार नसून मॉडेलप्रमाणे कमी अधिक प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. नेमकी किती वाढ करण्यात येईल हे वितरकांना सांगण्यात येईल. मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी वाहन कंपनी असून या कंपनीने दरवाढ केल्यानंतर इतर कंपन्या दरवाढ करीत असतात.