पुणे – पुण्यातील जेष्ठ व्यापारी रघुनाथ शेठ किसनराव ढम यांची नात व नितीन शेठ रघुनाथराव ढम यांची सुकन्या अनुश्री नितीन ढम उर्फ किट्टी/माऊ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री लवकरच एका हिंदी चित्रपटमधे पण महत्वाचे आणि मध्यवर्ती भूमिकेमधे दिसणार आहे.
अनुश्री उर्फ किट्टीचा “गुमनाम’ एक थ्रिलर नाइट हा मराठी चित्रपटाचा तीसरा भाग पुन्हा रिलीज होणार आहे. या मध्ये तिच्यासोबत केतन पेंडसे आहेत. तीला चित्रपट क्षेत्रातील आवडी संदर्भात विचारले असता तीने, मला लहानपणा पासुन अभिनयामध्ये रस होता. जेव्हा मी ह्या
क्षेत्रामधे आले तेव्हा मला भरपुर लोक म्हणत होते की ह्या क्षेत्रामधे तू काहीही करु शकणार नाही. पण जेव्हा आपण मेहनत घेतो तेव्हा आपण खुप काही गोष्टी करुन दाखवू शकतो, आणि मी करुन दाखवीले. माझी मेहनत आणि आई वडीलांची साथ मला इथपर्यंत घेऊन आली आहे. लवकरच माझा एक हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मी एक महत्वाची आणि मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे.