मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या बाप्पाचं काल मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. दरवर्षीप्रमाणे त्यानं यंदाही आपल्या स्वतःच्या हातानं इको-फ्रेंडली बाप्पा साकारला आहे. रितेशनं आपल्या सोशल मीडियावर बाप्पाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
I made the Ganesha idol at home out of Mud-clay. I want to be responsible towards my environment,hope we can leave a better-cleaner planet for our children. They learn from what they see. wishing you all happiness & prosperity #HappyGaneshChaturthi #ecofriendly #GanpatiBappaMorya pic.twitter.com/qhWBsXdvw1
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 2, 2019
अभिनेत्री स्मिता तांबे आणि अभिनेता राकेश बापट, रवी जाधव हे कलाकार दरवर्षी स्वतःच्या हातानी बाप्पाची मूर्ती घडवतात. दरम्यान, स्मिता तांबे दरवर्षी ट्री-गणेशा साकारते. गणेशाची मूर्ती घडवताना त्यात मातीचे बियाणं टाकते व विसर्जनावेळी घरच्याच कुंडीत बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करते.