पिंपरी, (प्रतिनिधी) – रहाटणी येथील न्यू सिटी प्राइड स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका नाझनीन शेख व शाळेतील पालकांची उपस्थित होते.
उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्या हस्ते कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे ,सरस्वतीचे व छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा प्रतिमाचे पूजन करण्यात आले. शाळेतून रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ग्रंथ दिंडीचे अयोजन करण्यात आले होते. “गर्जा महाराष्ट्र माझा” ही कविता, “गौरव महाराष्ट्राचे” गीत सादर केले.
प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी “बाईपण भारी देवा” हे नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी कर्मभूमी मायभूमी, नृत्य महाराष्ट्राचे, गाणं लोककलेच लेणं हे मराठी गीत सादर केली. निशा पवार आणि सचिन कळसाईत यांनी मराठी भाषा विषयाबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी “पसायदानाने कार्यक्रमाचे सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना देवरे व बबीता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.