मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीचा आत्मा समजला जाणारा ‘अशी ही बनवाबनवी’ आजही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतो. 23 सप्टेंबर 1988 रोजी हा चित्रपट रुपेरी पाड्यावर आला होता. चित्रपटाला इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. आजही या चित्रपटातील डायलॉग सर्वांनाच वेड लावतात.
मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना नेमक्या शब्दात मांडण्यासाठीही या चित्रपटातील संवाद, दृश्यं यांचाच सर्वाधिक वापर केला जातो. आजच्या पिढीने देखील या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे. सध्या जुने चित्रपट पुन्हा एकदा नव्या अंदाजात रिमेक बनवून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा ट्रेण्ड आहे.
अशात या चित्रपटाचा रिमेक येणार का असा प्रश्नही सोशल मीडियाच्या माध्यमांतून अनेक विचारला जातो अशात अभिनेत्री तेजस्वी पंडित हिने याबाबत खुलासा केला आहे. या वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनीला प्रश्न विचारण्यात आला की, अशी ही बनवाबनवी’चा रिमेक बनला तर अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिकेत कोणत्या कलाकाराला बघायला आवडेल, यावर तेजस्विनी म्हणाली,’अशी ही बनवाबनवी’चा रिमेक मी बनवला तर सचिन पिळगावकरांच्या भूमिकेसाठी मी सिद्धार्थ चांदेकरला कास्ट करेन, कारण त्या चित्रपटात सचिन सर स्त्री वेशात इतके गोड दिसले आहेत. सिद्धार्थ चिकना आहे. तो स्त्री वेशात खूप गोड दिसेल. त्या पात्रात तो खूप छान दिसेल असं मला वाटतं. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भूमिकेसाठी मी अभिनयलाच कास्ट करेन. तो ते खूप छान पद्धतीने वटवू शकेल. अशोक सराफ यांच्या भूमिकेसाठी मी अमेय वाघला कास्ट करेन’ असं म्हणत तिने या चित्रपटाचा प्रश्नावर आपलं मत मांडल.