Maratha Protest । मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणीसाठी मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून येतंय. कारण परभणीत मराठा आंदोलकांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना अडवल्याची होती. त्यानंतर आता परभणीत राजकीय नेत्यांच्या बॅनरला काळे फासण्यात आल्याची माहिती समोर येतीय.
परभणी तालुक्यातील शहापूर येथे आज पाच कोटी रुपयांच्या रस्त्याचा शुभारंभ होणार आहे. या अनुषंगाने शहापूरमध्ये महाविकास आघाडीच्या खासदार डॉ. फौजिया खान, सेनेचे खासदार बंडू जाधव, सेनेचे आमदार राहुल पाटील तसेच काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते. मात्र, मनोज जरांगेची चौकशी यावरून नाराज असल्याने मराठा समाजातील तरुणांनी या बॅनरला काळे फासले.
‘मनोज जरांगे तुम आगे बढो,…Maratha Protest ।
‘मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘या राजकारण्यांचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक होतांना दिसतोय. काल खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अडवेळी. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याऐवजी आदर्श घोटाळ्याची एअसायटी चौकशी करा, अशी मागणी केली. त्यानंतर आता परभणीतील शहापूरमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बॅनरला काळे फासण्यात आले आहे.
जरांगे ओबीसी आरक्षणावर ठाम… Maratha Protest ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावे. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच आपल्या याच मागणीवर आपण ठाम असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तर आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच असणार असल्याचे देखील जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.