चिंबळी -खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील विविध गावांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्या-त्या गावांतील रस्ते बांबू लावून सील करण्यात आले आहेत. तसेच रुग्ण आढळलेल्या ठिकाणाचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
करजंविहीरे व शेलपिपंळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चिंबळी, निघोजे, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे, चल्होली खुर्द प्राथमिक उपकेंद्राच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिबंधक उपाय म्हणून विविध ठिकाणी साफसफाई करण्याचे व औषध फवारणी करून घरोघरी जावून सर्वेक्षण सुरू आहे. गावात विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करून दंड वसूल केला जात आहे.