अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कोपरगाव: मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये सुरु असलेला भाजप कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच असून कोल्हे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कोकमठाण व कान्हेगाव येथील कोल्हे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंगचे प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, संचालक सुदाम लोंढे, जि. प. सदस्य प्रसाद साबळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, लक्ष्मण चौधरी, देवचंद, कडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकमठाण येथील साहेबराव रक्ताटे, राजेंद्र रक्ताटे, राजेंद्र वाघ, भाऊसाहेब रक्ताटे, रघुनाथ रक्ताटे, गणेश रक्ताटे, आबा रक्ताटे, सुनील रक्ताटे, परसराम रक्ताटे, दीपक रक्ताटे, भाऊसाहेब रक्ताटे, गणेश वाघ, अमोल रक्ताटे, विशाल शितोळे, महेश रक्ताटे आदी कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत असलेले भाजप कार्यकर्ते कोल्हे गटाची चिंता वाढविणारे आहे. मागील पाच वर्षात मतदारसंघातील जनतेने तालुक्‍याच्या आमदारांना सत्ता दिली, मात्र जनतेची घोर निराशा होवून जनतेवर पश्‍चाताप करण्याची वेळ आली. या उलट कोणत्याही प्रकारची सत्ता नसतांना सातत्याने जनतेच्या प्रश्नांभोवती स्वत:ला बांधून घेतलेल्या आशुतोष काळे यांनी सर्वसामान्य मतदारांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असून आशुतोष काळे यांची ताकद दिवसागणिक वाढत आहे. मागील पाच वर्षात मतदारसंघाचा विकास थांबला आहे.

याउलट आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचविला आहे. मतदार संघातील रस्त्याचे प्रश्न, शेतीच्या व पिण्याच्या प्रश्न सुटलेले नाही. कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे मतदार संघातील जनतेमध्ये तालुक्‍याच्या आमदारांविषयी प्रचंड नाराजी असल्यामुळेच जनतेने विकासाची दूरदृष्टी असलेल्या काळेंकडून विकासाचे प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात भाजपसह इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)