मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीचा फोन आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून चाकणकर यांनी याप्रकरणी तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
यातच तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, चाकणकर यांना धमकावणारा जयंत रामचंद्र पाटील (वय ३५, रा. तांबवे, ता. वाळवा) हा मानसिक रुग्ण असल्याचे समोर येत आहे. जयंत रामचंद्र पाटील याने अर्वाच्य भाषा वापरून चाकणकरांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचे तेथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या तरुणाची घरची परिस्थिती बेताची आहे. वडील शेतकरी आहेत. त्याने बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. अशी माहिती पोलिसांनीदिली आहे.