Lok Sabha Election 2024 । महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अखेर जागा वाटपाची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. या मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट 21 लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस पक्ष 17 लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार आहे. शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 लोकसभा मतदार संघात उमेदवार उभा करणार आहे. अशी घोषणा आज एकत्रितपणे करण्यात आली. महाविकास आघाडीत 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा असा फॉर्म्युला ठरला आहे.
दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. यावर आता शरद पवार यांनी माध्यमांशी बोलतांना उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी कमी जागा लढवण्यासंदर्भात आपली रणनीती सांगितली.
नेमकं काय म्हणाले शरद पवार…
‘आम्ही लोकसभेसाठी फक्त दहा जागांवर उमेदवार दिले कारण.. 2019 सालामध्ये आमचे चार खासदार होते. परंतु आमचे लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे. लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ते पुढे म्हणाले, आम्ही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमार्फत जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे लोकसभेत आम्ही कमी जागा घेतल्याचे शरद पवार म्हणाले. ५० टक्केपक्षा जास्त जागांवर महविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.