पुणे – भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना एका भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. याबाबतच्या वृत्ताला स्वतः खडसे यांनी दुजोरा दिला असून येत्या ३० तारखेला आपण चौकशीसाठी ईडीपुढे हजार राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्यात ईडीच्या सुरू असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी वृत्तमाध्यमांशी बोलतांना खोचक टीका केली आहे.
मोठी बातमी: राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंनी अखेर मौन सोडलं; म्हणाले, ‘होय, मला EDची नोटीस मिळाली’
खडसेंच्या ‘ईडी मागे लावली तर सीडी लावीन’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…
भाजपा प्रिय ED.
एकदा महाराष्ट्रात पण ये. मेहता, दरेकर, बापट, यांच्या घराचा पत्ता तुझ्याकडे नसेल. हवा तर मी देतो. मात्र अशी दुटप्पी वागू नकोस. एखाद कप कॉफी प्यायला इकडे पण जाऊन ये. नाहीतर तुझ्या अशा एकतर्फी प्रेमाला उद्या “सनम बेवफा” म्हणतील लोकं.. @TV9Marathi— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 26, 2020
काय म्हणाले अमोल मिटकरी
भाजपा प्रिय ED.
एकदा महाराष्ट्रात पण ये. मेहता, दरेकर, बापट, यांच्या घराचा पत्ता तुझ्याकडे नसेल. हवा तर मी देतो. मात्र अशी दुटप्पी वागू नकोस. एखाद कप कॉफी प्यायला इकडे पण जाऊन ये. नाहीतर तुझ्या अशा एकतर्फी प्रेमाला उद्या “सनम बेवफा” म्हणतील लोकं..