मुंबई – मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील कारनाम्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळेच मानसीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतात. मानसी सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे देखील पाहायला मिळते.नुकतंच मानसीने अक्षय्य तृतीयानिमित्त नवीन घर खरेदी केलं आहे. याबाबतची एक पोस्ट देखील तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रत्येकाने काहीतरी खास करण्याचा प्रयत्न केला. त्यात अभिनेत्री मानसी नाईक देखील आघाडीवर होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मानसीने घर खरेदी केल्याचे समजते. यावेळी मानसीने कुटुंबियांसह घरामध्ये मंगलमय वातावरणात पूजा देखील केली.
मानसी आपल्या पोस्टमध्ये म्हणते,”प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक तरी घर असावं, जिथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं, दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं.. या रखरखीच्या जगण्यात वावरतांना उमेद देणार डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं.. एक घर संस्कारांची शिदोरी असते” यासह मानसीने घरातील पूजेचा व्हिडीओ शेअर करत सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
गेल्या काही महिन्यांमध्ये मानसी तिच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत होती. सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह असलेल्या मानसिला अद्याप बड्या ब्लॉकबस्टर चित्रपटाची प्रतीक्षा आहे. मात्र आजही मानसीची बघतोय रिक्षावाला ‘बाई वाड्यावर’ या ही गाणी सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत.