पुणे : शहरातील मध्यवस्तीतील एका डॉक्टरांकडून 75 लाख रूपयांची खंडणी घेतल्याप्रकरणात अटकेत असलेल्या मनोज तुकराम अडसुळ उर्फ अत्रे (वय 48,रा.48.रा.बिल्डींग नं.12,फ्लॅट नं.209,मीरा सोसायटी,सॅलिसबरी पार्क ) याला सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी 30 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.
त्याने अॅड. विजयसिंह ठोंबरे आणि अॅड. हितेश सोनार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी डॉ.दिपक प्रभाकर रासने (वय 69, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे.ही घटना 18 ऑक्टोबर 2019 ते 6 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला.
फिर्यादी डॉ.दीपक यांचा मुलगा डॉ.साहील याच्यावर 18 ऑक्टोबर 2019 रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात महिलेच्या विनयभंगाची तक्रार दाखल झाली होती.आरोपी मनोज अडसुळ याने ती महिला दलित मुस्लीम समाजाची आहे. ती डॉ.साहील यांच्यावर बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दाखल करणार आहे.त्यामध्ये त्याला 3 ते 10 वर्षाची शिक्षा होवु शकते.अशी भिती दाखवत साहील यांच्या अटकेचा खोटा बनाव करून हे प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटी 30 लाख रूपयांची मागणी केली.
त्यापैकी 54 लाख रूपये धनादेशाव्दारे, तर 21 लाख रूपये रोख स्वरूपात स्वीकारले असल्याचे फिर्यादीत म्हटेल आहे. न्यायालयीन कोठडीत असताना अडसुळ याने जामिनासाठी अर्ज केला. आरोपीकडून जरी 60 लाख रुपये जप्त केले आहेत. तरी ती रक्कम त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आली आहे. प्रायोगिक तपास पूर्ण झाला असून, फिर्यादी आणि आरोपीचे जुने व्यवहारिक संबंध आहेत. त्याने गुन्हा केला असून, त्याला जामीन देण्याचा युक्तीवाद अॅड. ठोंबरे यांनी केला.