मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 100 वा भाग आज रविवारी 30 एप्रिल रोजी प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी झालेल्या मन कि बातमधील अनेक आठवणींना उजाळा दिला. हा भाग देशभरातील 4 लाख केंद्रांवर थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. ‘मन की बात’च्या या कार्यक्रमात देशभरातील विविध सामाजिक संस्था, नागरी संस्था आणि इतर संघटनाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आज सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित झाला.
नऊ वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालेला हा विशेष रेडिओ कार्यक्रमाने आज रविवारी 100 भाग पूर्ण केले आहे. या नऊ वर्षांत ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी विविध मुद्यांवर आपली मतं मांडली. याशिवाय त्यांनी या कार्यक्रमाच्या मध्यमातून देशातील जनतेशी थेट संवादही साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमामुळे अनेकांचा रेडिओ ऐकण्याचा कल वाढला.
दरम्यान, आज ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 100 वा भाग सुरू असताना एक नवरदेव चक्क लग्न असतानाही हजर राहिला होता. इतकंच नाही तर आधी मन की बात, नंतर लग्न असं म्हणत त्याने मोदींचं पूर्ण मनोगतही ऐकलं. सध्या या नवरदेवाचा एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.
झालं असं की.., बुलडाण्यात सार्वजनिक ठिकाणी मन की बातचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी सजलेला नवरदेव तिथे आला. मन की बातचा कार्यक्रम सुरु असल्याचं पाहून तो तिथेच बसला आणि आधी मन की बात नंतर लग्न अस बोलत त्याने पंतप्रधान यांचे मनोगत ऐकले. मोदींच्या या कार्यक्रमासाठी भाजपकडून सार्वजनिक ठिकाणी TV स्क्रिन लावण्यात आली होती. त्यामुळे नागरिक पंतप्रधान यांची मन की बात पाहत होते. त्यात एक नवरदेव त्या ठिकाणी पोहचला आणि पहिले मन की बात नंतर लग्न अस बोलत मोदी यांचे मनोगत ऐकत होता.