अतिक्रमण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद
मंचर- मोरडेवाडी-बागलवस्ती (ता. आंबेगाव) येथील जमिनीत उसाचे पीक अनाधिकाराने रोटारून, तसेच बेकायदेशीररीत्या झाडे लावून अतिक्रमण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात शशिकांत नामदेव बागल यांनी फिर्याद दिली आहे.
बागलवस्ती येथील जमीन गट क्र. 06/2/अ/2 या जमिनीत असणारे उसाचे पीक अनाधिकाराने रोटारून नुकसान केले असून, तसेच या जमिनीत आंब्याची झाडे लावून अतिक्रमण केले आहे. याबरोबरच या जमिनीत यायचे नाही, असे म्हणून शिवाजी बाबुराव बागल, स्वप्नील शिवाजी बागल, पद्मा शिवाजी बागल, श्रद्धा स्वप्नील बागल (सर्व रा. मंचर ता. आंबेगाव) यांनी शशिकांत बागल आणि त्यांचा भाऊ चंद्रकांत बागल यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत शशिकांत बागल यांनी फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ए. बी. मडके करीत आहेत.