वाॅशिंग्टन – कोणत्या वस्तूला कधी काय किंमत येईल याचा नेम नाही. अमेरिकेत 20 डॉलर म्हणजेच अवघ्या 1400 रुपयांच्या नाण्याच्या बदल्यात तब्बल 138 कोटी मिळाले आहेत.
न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी 1933 सालच्या डबल इगल सोन्याच्या नाण्याचा लिलाव झाला होता. या नाण्याच्या लिलावाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. 1400 रुपयांच्या नाण्यासाठी 138 कोटीची बोली लागली आहे.
या अत्यंत साधारण दिसणाऱ्या खास नाण्याची 18.9 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 138 कोटींमध्ये विक्री झाली आहे. तसेच यावेळच्या लिलावात डबल इगल सोन्याच्या नाण्यासह जगातील सर्वात दुर्लभ तिकिटांची देखील 60 कोटी रुपयांत विक्री झाली आहे.
स्टुअर्ट विट्समॅन यांनी हे नाणं विकलं आहे. 2002मध्ये त्यांनी हे नाणं 55 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. या नाण्याची 73 ते 100 कोटी दरम्यान बोली लागेल, अशी त्यांना आशा होती.