पुणे – बॉलिवूड अभिनेता ‘जॅकी श्रॉफ’ यांच्या साधेपणाचं रूप आज पुन्हा एकदा दिसून आलं आहे. जॅकी यांच्यासाठी काम करणाऱ्या पुण्यातील चांदखेड परिसरातील एका घरगड्याच्या वडिलांचं निधन झालं आणि जॅकी तातडीने घरगड्याच्या घरी गेले. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पुण्यात जॅकीचं फार्महाऊस आहे आणि या फार्महाऊसच्या देखरेखीचं काम हा व्यक्ती करतो. मात्र, या घरगड्याच्या वडिलांचं निधन झालं आणि ही बातमी जॅकी यांना समजताच त्यांनी तातडीनं या परिवाराची भेटली घेतली. आणि सांत्वन केलं. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये असं दिसून येत की, जॅकी घरगड्याच्या कुटुंबियांसोबत जमिनीवर बसले आहेत. ते त्यांची विचारपूस करत आहेत. आणि त्यांचा हाच साधेपणा आणि नम्रता चाहत्यांना भावली आहे.
1983 साली ‘हीरो’ चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाऱ्या जॅकी श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1957 रोजी गुजराती कुटुंबात झाला होता. जॅकी दादांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. ते मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील तीन बत्ती नावाच्या चाळीत राहात होते. बालपणी ते चित्रपटांच्या प्रदर्शनाची आणि निवडणुकींची वाट बघायचे. लोकप्रियता, प्रसिद्ध आणि पैसा मिळाल्यानंतर ही जॅकी श्रॉफ अतिशय सामान्य व्यक्ती म्हणून ह्या समाजात वावरत असतात.