मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री “मल्लिका शेरावत’ने 2003 साली आलेल्या ‘जीना सिर्फ मेरे लिए’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. पहिल्या चित्रपटात मल्लिकाने 17 किसिंग सीन्स दिल्यामुळे ती चर्चेत आली होती. मात्र, ‘मर्डर’ चित्रपटातून मल्लिकाला खरी प्रसिद्धी मिळाली. मल्लिका सिनेसृष्टीत झळकण्यापूर्वी ती एअरहोस्टेस म्हणून काम करायची. मल्लिका शेरावतचे खरे नाव रिमा लांबा आहे.
View this post on Instagram
मल्लिका शेरावत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधते. तसेच मल्लिका सोशलवर आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करते. तिचे फॅन्स सुद्धा या हॉट अँड बोल्ड लूकवर कमेंट आणि लाईक्सचा जोरदार वर्षाव करतात.
View this post on Instagram
दरम्यान, नुकतंच मल्लिका ने आपल्या इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या साडीतील मल्लिका शेरावतचा देसी अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. या फोटोंमध्ये ती अतिशय मादक दिसत आहे. मल्लिका 44 वर्षांची असली तरी ती आजही एखाद्या तरुणीइतकीच सुंदर आणि मादक दिसते.
View this post on Instagram
मल्लिका शेरावतने चित्रपटात काम करण्यापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात काम केले आहे. मल्लिकाने जीना सिर्फ मेरे लिए चित्रपटातून सिने कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर मल्लिका शेरावतने ख्वाहिश आणि मर्डर या चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. मल्लिका शेरावतला इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास मल्लिका अखेरच्या वेळी 2019 मध्ये “बू सबकी फटेगी’ या वेब सीरीजमध्ये झळकली होती. तसेच अरबाज खानसह “दबंग-3’मध्येही तिने निर्णायक भूमिका साकारली होती. तिचा हॉट अंदाज आणि सेक्सी लुक सगळ्यांना आठवतो. तिच्या या इमेजमुळेच बॉलीवूडमध्ये तिच्या वाट्याला ठराविक साच्याच्या भूमिका येत गेल्या. मल्लिका बॉलिवूड चित्रपटांशिवाय काही आयटम साँग्सवर सुद्धा थिरकली आहे.
View this post on Instagram