नाशिक: मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय. आजच्या घडीला एकट्या मालेगावात करोनाचे तब्बल 30 रुग्ण आहेत. मालेगावकरांना लॉकडाऊन, संचारबंदी मंजूर नाही अशी स्थिती आहे. यामुळं एका दिवसात मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.
मालेगावकरांमुळे एका दिवसात नाशिक जिल्हा कोरोनाच्या ग्रीन झोनमधून रेड झोनमध्ये गेला. मालेगावात कोरोना वेगानं पसरला. याला दुसरं तीसरं कोणीही जबाबदार नसून खुद्द मालेगावकरच कोरोनाच्या प्रसाराला जबाबदार आहेत. देशात लॉकडाऊन आणि राज्यात संचारबंदी असतानाही मालेगावमधे मात्र सर्व जनजीवन सुरळीत होतं. बाजारपेठेत गर्दी होती. धार्मिक स्थळी सामूहिक प्रार्थना सुरु होती.
चुकीच्या धार्मिक संकल्पना डोक्यात बसवल्या गेल्यामुळे त्यांना अद्याप या गंभीर समस्येचे गांभीर्यच समजलेले नाही, अशी स्थिती आहे. ते पोलिसांनाही जुमानत नसल्याचे काही घटनांवरून समोर आले आहे. राज्याचा विचार करता आणि करोना आटोक्यात आणायचा असेल तर कोणालाच न जुमानणाऱ्या या मालेगावकरांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोरोनाचा फैलाव रोखणे कठिण होणार आहे.